Monday, September 7, 2009

ओलाव्यात त्यांच बरच काही फावत….


पावसाला म्हटला की असे नेहमीच घडणार,
प्रेमाची सर अधुन मधुन रिम-झिम पडणार,
गड-गडनारया हदयाला अजुन काय पाहिजे?
भिजलेल्या प्रेमाला हेच तर पाहिजे,
ओलाव्यात त्यांच बरच काही फावत….

दिवसा अचानक अंधारी पाहुन,
मनातला दिवा पेटतोय कसा?
एकमेकाला भेटण्याची आस होणारच ना,
मुसलदार पावसाला पाहुन थोडी आहे थांबनारे,
तो किवा ती…!म्हटले आहे ना,
ओलाव्यात त्यांच बरच काही फावत….

रंगेबी-रंगी छत्र्याच्या आड़ आधार वाटतो,
न भिजन्याचा तो एक बहाना वाटतो,
गरवा पडलाय मग अस तर होणारच ना!
तो किवा ती…!म्हटले आहे ना,
ओलाव्यात त्यांच बरच काही फावत….

कुड-कुडनारया जोडप्याना कुड- कुडणारी ठंडी,
कुड-कुडनारया होटावर कुड-कुडणारे शब्द,
उबेची सर येणारच ना!
गच मिठीत कुर-कुर होउनच रहाणार,
तो किवा ती…!म्हटले आहे ना,
ओलाव्यात त्यांच बरच काही फावत….

पाउस जरी थांबला तरी ओलावा तसाच राहतो,
कल्पना करावी तितकीच कमी आहे,
आठवण म्हणुन काही क्षण
मात्र आयुष्यभर असेच रिम-झिम करतात…
- रोहित कोरगांवकर

No comments:

Post a Comment