Saturday, December 31, 2011

थडाव्यात त्यांच बरच काही जमत...


ठंडी पडलीय मग आता अस घडणारच,

कुड-कुडणारया इच्छा मनात बोचणारच,

थर-थरणारया शरीराला अजुन काय पाहिजे?

सुखावालेल्या प्रेमाला हेच तर पाहिजे,

थडाव्यात त्यांच बरच काही जमत...

पहाटे अचानक धुके पाहून,

मानत गारवा पडतोय कसा?

एकमेकाला खेटण्याचे भास होणारच ना,

प्रेमळ निसर्गाला पाहुन थोडी आहे थांबनारे,

तो किवा ती…!म्हटले आहे ना,

थडाव्यात त्यांच बरच काही जमत...

रंगेबी-रंगी शालच्या आड़ आधार वाटतो,

थंडीचा तो एक बहाना वाटतो,

गरवा पडलाय मग अस तर होणारच ना!

तो किवा ती…!म्हटले आहे ना,

थडाव्यात त्यांच बरच काही जमत...

कुड-कुडनारया सहवासला कुड-कुडणारे क्षण,

शीव-शीवणारया होटावर कुज-बुजणारे शब्द,

ऊबेची आस येणारच ना!

गच मिठीत लूप-चुप होउनच रहाणार,

शेवटी एकाच गोष्ट खरी...

तो किवा ती…!म्हटले आहे ना,

थडाव्यात त्यांच बरच काही जमत...

ठंडी जरी गेली तरी गारवा कायम रहातो,

आठवणी काढ़ाव्या तितकीच कमी आहेत,

शहारे म्हणुन काही भास,

मात्र आयुष्यभर असेच कुड कुड करतात…

Wednesday, September 30, 2009

मन होई पाखरा


मन होई पाखरा
धक धकत्या माझ्या हृदया,


तु होई बेधुंद
छेड़े मधुरा माझ्या मना,


तुला पंख सुख दुखाची
घे भरारी माझ्या मना ,


त्या वेदना अंतरी
वाहत्या आसवांच्या धारा माझ्या मना,


तुझ ओढ़ सुखाची
मुखी दिसे खुलते हास्य माझ्या मना,


तुझ्यात घरटे प्रेमाचे
नाती -गोती जपतोस माझ्या मना,


तुझा संभाल आठवनीचा
समाधान भुतकालाचे माझ्या मना,


येती स्वप्ने अनोखी अनोखी
गोड-गोड उद्याचे भविष्य समाधानी माझ्या मना,


आयुष्य जगायचे असेल तर जोड़ पंखाची हवी,
सुख-दुखा सोबत भरारी घेता यायला हवी,


-रोहित कोरगांवकर

Monday, September 7, 2009

ओलाव्यात त्यांच बरच काही फावत….


पावसाला म्हटला की असे नेहमीच घडणार,
प्रेमाची सर अधुन मधुन रिम-झिम पडणार,
गड-गडनारया हदयाला अजुन काय पाहिजे?
भिजलेल्या प्रेमाला हेच तर पाहिजे,
ओलाव्यात त्यांच बरच काही फावत….

दिवसा अचानक अंधारी पाहुन,
मनातला दिवा पेटतोय कसा?
एकमेकाला भेटण्याची आस होणारच ना,
मुसलदार पावसाला पाहुन थोडी आहे थांबनारे,
तो किवा ती…!म्हटले आहे ना,
ओलाव्यात त्यांच बरच काही फावत….

रंगेबी-रंगी छत्र्याच्या आड़ आधार वाटतो,
न भिजन्याचा तो एक बहाना वाटतो,
गरवा पडलाय मग अस तर होणारच ना!
तो किवा ती…!म्हटले आहे ना,
ओलाव्यात त्यांच बरच काही फावत….

कुड-कुडनारया जोडप्याना कुड- कुडणारी ठंडी,
कुड-कुडनारया होटावर कुड-कुडणारे शब्द,
उबेची सर येणारच ना!
गच मिठीत कुर-कुर होउनच रहाणार,
तो किवा ती…!म्हटले आहे ना,
ओलाव्यात त्यांच बरच काही फावत….

पाउस जरी थांबला तरी ओलावा तसाच राहतो,
कल्पना करावी तितकीच कमी आहे,
आठवण म्हणुन काही क्षण
मात्र आयुष्यभर असेच रिम-झिम करतात…
- रोहित कोरगांवकर

पडल्यावर हसतो , फसल्यावर रडतो

पडल्यावर हसतो , फसल्यावर रडतो
प्रेमात पडल्यावर गाऊ लागतो प्रेमाचे पोवाडे,
कधी न खुललेला चेहरा हि फुलवतो फुलोरा,
पण काय सर त्या कोमजलेल्या फुलाची,
फसलेल्या प्रेमा मधल्या मनाची…

पडल्यावर हसतो , फसल्यावर रडतो
हसणारा सांगतो हसण्यात आहे किती कमाल,
“तु हि एकदा पड प्रेमात”
कधी न हसलेला माणुस हि हसतो तेव्हाच,
जेव्हा तो पडतो प्रेमात…

पडल्यावर हसतो , फसल्यावर रडतो
प्रेम हि किती स्वार्थी असते हे,
काही नाती तोडून नवी जपतात हे,
आज नसतो तो आमच्या मध्ये,
कारण तो नाही आज स्वताच मध्ये,
तो असतो फक्त तिच्या मध्ये…

फसगत मित्राची प्रेमा मध्ये,
म्हणुन आला मित्र मित्रान मध्ये,
राडनारा सांगतो रडन्यात आहे किती वेदना,
“नको मित्रा कधी पडू प्रेमात”
कधी न रडलेला माणुस हि रडतो तेव्हाच
जेव्हा फसतो प्रेमात…
- रोहित कोरगांवकर