Monday, September 7, 2009

पडल्यावर हसतो , फसल्यावर रडतो

पडल्यावर हसतो , फसल्यावर रडतो
प्रेमात पडल्यावर गाऊ लागतो प्रेमाचे पोवाडे,
कधी न खुललेला चेहरा हि फुलवतो फुलोरा,
पण काय सर त्या कोमजलेल्या फुलाची,
फसलेल्या प्रेमा मधल्या मनाची…

पडल्यावर हसतो , फसल्यावर रडतो
हसणारा सांगतो हसण्यात आहे किती कमाल,
“तु हि एकदा पड प्रेमात”
कधी न हसलेला माणुस हि हसतो तेव्हाच,
जेव्हा तो पडतो प्रेमात…

पडल्यावर हसतो , फसल्यावर रडतो
प्रेम हि किती स्वार्थी असते हे,
काही नाती तोडून नवी जपतात हे,
आज नसतो तो आमच्या मध्ये,
कारण तो नाही आज स्वताच मध्ये,
तो असतो फक्त तिच्या मध्ये…

फसगत मित्राची प्रेमा मध्ये,
म्हणुन आला मित्र मित्रान मध्ये,
राडनारा सांगतो रडन्यात आहे किती वेदना,
“नको मित्रा कधी पडू प्रेमात”
कधी न रडलेला माणुस हि रडतो तेव्हाच
जेव्हा फसतो प्रेमात…
- रोहित कोरगांवकर

No comments:

Post a Comment