Monday, September 7, 2009

पहिला स्पर्श


पहिला स्पर्श तुझा झाला
तेव्हा मन हि बागडल होत…
सेरवैर उड़नारया पाखरा सारख
जणु गगनात सामवल होत…

पहिल्यांदा अस घडल होत
प्रेमळ सहवास वहात होता…
तशीच कुड कुड शरीराची
जणू काही वहात असलेला झरयाची खल-खल…

त्या दिवसा पासून नाहीशी झालीय निद्रा
आज हि जाणवतय रात्रीच्या शांत स्वप्नात
त्या गोष्टी…
गुदगुदल्या पावसाच्या रिमझिम सरयांची आठवण
मीठी होती ती चिप-चिप ओल्या आठवणीची
होटानवर थेम्ब त्या गोड़-गोड़ आठवनिचे
सतावनारे क्षण भिजलेल्या आठवणीने
गालावर खळी नाजुन कळी फुलते तशी …

समुन्द्र किनारी पहात होत्या त्या लाटा
चोरून-चोरून आदलत होत्या किनारी…
पहिल्यांदा असे घडले होते
पहिला स्पर्श तुझा झाला
तेव्हा मन हि बागडल होत…

कधी संध्या आली
अन कधी दिनकर नाहीसा झाला
पहात राहिली खेळ
वेडी तुझी-माझी प्रीति
“थांब ना ग”
“नाही रे ! उशीर झालाय ”

काय बोलू तुला पण तेव्हा तु पण हताश होतीस
थांबन्याची आस होती पण निरोप घेउन जात होतीस…

स्पर्श मात्र असाच जाणवत राहिल
तुझ्या सहवासाची कात टाकत राहिल…

- रोहित कोरगांवकर

No comments:

Post a Comment