Tuesday, May 19, 2009

माझ्या आयुष्यात.....


प्रेम पुन्हा नको येउस रे!!
माझ्या आयुष्यात.....
तुझा विसर कसा करू रे?
तुझ्या आठवणीना कुठे साठवू रे?
तुझ्या सहवासाला कस दडपु रे?

प्रेम व्यक्त करण्याच धाडस,
माझ्याकडून झाल नाही;
शब्दाना ओठान बाहेर,
कधी पडताच आल नाही;
माझे प्रेम मलाच सतावत आहे
प्रेम पुन्हा नको येउस रे!!
माझ्या आयुष्यात.....

अर्ध्यावर कोठे लुप्त झालास तु ?
प्रेम शिवाय प्रीति अधुरी केलीस तु;
तुला शोधता शोधता काळ निघून गेला,
पण तु काही मिळेनासा झालास;
प्रेम पुन्हा नको येउस रे!!
माझ्या आयुष्यात.....

एकट्या आयुष्यात कोणी साजन आला,
साथ नमांगता हि कोणी आधार दिला,
विचार नसता ना हि कोणी स्वप्ने दाखवून गेला,
मनात माझ्या कोणी आपल घर करून राहिला;
तरी प्रेम कस विसरु रे तुला मी?
इतक प्रेम कस केल तुझा वर मी?
प्रेम पुन्हा नको येउस रे!!
माझ्या आयुष्यात.....

प्रेम तु माझा होऊ शकला नाहीस,
साजनला प्रेम देऊ शकत नाही,
स्वताच्या मनाला समजावू शकत नाही,
प्रेम पुन्हा नको येउस रे!!
माझ्या आयुष्यात.....

- रोहित कोरगांवकर
(हि कवीता तुमचे मत घेण्या साठी आहे. नक्की या प्रीति ने काय करावे आता ? पण विचार करताना विसरु नक्का पहिला प्रेम होत ते....)

No comments:

Post a Comment