Tuesday, May 19, 2009

फक्त तुझ्या आठवणी घेउन


चालली आहे एकटीच फक्त तुझ्या आठवणी घेउन,
आठवनीचा सागर ही आहे खुप विशाल,
आठवणीच्या ओघात वाहत आह फक्त तुझ्या आठवणी घेउन,

आठवणीचा डोंगर ही अत्यंत उंच,
आठवणीच्या अंतरावर मात करतेय फक्त तुझ्या आठवणी घेउन,

आठवणीचा वन्सागर ही आहे दाट,
आठवणीच्या जंगलात जगतेय सन्यासी जीवन
फक्त तुझा आठवणी घेउन,

आठवणीचा आभाळ ही आहे विस्तारलेले,
आठवणीच्या भरारीने भटकंती करतेय फक्त तुझ्या आठवणी घेउन,

पिंजर मधील वाघिणी सारखी अवस्था माझी,
वाघाच्या सहवासाशी दूर राहून खरच
झुरतेय फक्त तुझ्या आठवणी घेउन,

वाघिणीच्या डोळ्यातील पाणीपाहुन सारे जंगल हादरले,
वाघिनिचा पण ससा होतो हे आज सार्याना पटलय,

प्रेम करताना अस कधी जानवल नव्हत होइल अस ही कधी,
तुझ्या - माझ्या प्रेमाच्या गुहेत कोणी तिसर्याचा वास,

चालता चालता थकवा पण नाही जाणवला
पण वेळेने आज मात्र दगा दिला ,

आठवणीच्या प्रकाश अजुन पसरला नाही,
इतक्यात दिवसाचा सूर्य ही दिसेनासा झाला,

सुर्याला पाहत फक्त एकच सांगावेसे वाटते,
"उदया नक्की मला भेट अजुन चालायच फक्त त्याच्या आठवानित"


- रोहित कोरगांवकर

No comments:

Post a Comment